Wednesday, 15 Sep, 8.05 pm प्रभात

मुखपृष्ठ
धक्कादायक! 10 टक्के व्याजदराला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पुणे - घराचे हप्ते मित्राकडून 5 लाख रुपये घेतले होते. त्यावर दरमहा तब्बल 10 टक्के व्याज आणि त्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तरुणाने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. सचिन काळभोर (40, रा. पिसोळी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुहास ननावरे (रा. धायरी) याच्याविरूद्ध कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पत्नी कामिनी काळभोर यांनी तक्रार दिली आहे.

काळभोर दाम्पत्याने काही वर्षांपूर्वी फ्लॅट खरेदी केला होता. त्याचे शेवटचे हप्ते भरून कर्ज कमी करण्यासाठी सचिनने मित्र सुहास ननावरे यांच्याकडून 5 लाख रुपये व्याजाने घेतले होते. व्याजापोटी सचिन दरमहा सुहासला 10 टक्के दराने 50 हजार रूपये देत होता. त्यामुळे सचिनची आर्थिक ताणाताण होत होती. काही दिवसानंतर सुहासने सचिनकडे 5 लाख रुपयांचा तगादा लावला होता. परंतु, पैसे नसल्यामुळे सचिन त्याला महिन्याला 50 हजारांचे व्याज देत होता.

दिलेली रक्कम परत माघारी पाहिजेत, या कारणासाठी सुहास सचिनला शिविगाळ करत होता. त्यामुळे त्रासाला कंटाळून सचिनने त्याला 'फ्लॅट नावावर करून देतो' असे सांगितले. मात्र, सुहासने 'मला पैसे पाहिजेत, नाहीतर तुझ्या बायको-पोरांना रस्त्यावर आणेन,' अशी धमकी दिली. त्यामुळे मानसिक त्रासाला कंटाळून सचिनने 5 ऑगस्ट 2020 मध्ये राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी तब्बल वर्षभरानंतर तक्रार देण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top