Wednesday, 15 Sep, 8.08 pm प्रभात

ताज्या बातम्या
डी गॅंगशी महंमद जानचे 20 वर्षांपासून संबंध ; महाराष्ट्र एटीएसची माहिती

मुंबई -दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी एक हा मुंबईच्या धारावी येथील आहे. त्याचे नाव जान महंमद अली महंमद शेख असे आहे. त्याचे पाकिस्तानातील डी गॅंगसोबत संबंध असल्याचे अनेक रेकॉर्ड आहेत. जवळपास 20 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आहे. आमच्या नजरेत तो होताच. पण दहशतवाद्याच्या कटबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती. ती सेंट्रल एजन्सीकडे होती. त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांना दिली गेली होती, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अगरवाल यांनी दिली.

देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचे समोर आले आहे. ही कामगिरी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केली आहे. पण एवढ्या मोठ्या कटाची माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला कशी मिळाली नाही? असा सवाल विरोधकांडून उपस्थित केला जात आहे. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी आपली भूमिका मांडली.

विनीत अगरवाल म्हणाले, जान शेखने 9 सप्टेंबरला जाण्याचे नियोजित केले. त्याने 10 तारखेला पैसे ट्रान्सफर केले. त्याचं तिकीट कनफॉर्म होत नव्हते. तर त्याने 13 तारखेचे वेटिंग लिस्ट सहामध्ये नाव नोंद करत तिकीट घेतले. गोल्डन टेम्पल एक्‍सप्रेस ट्रेनचे त्याने तिकीट घेतले. त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याचे तिकीट कन्फर्म झाले. तो मुंबई सेंट्रलहून एकटा निजामुद्दीमच्या दिशेला रवाना झाला.

प्रवासादरम्यान तो कोटा येथे जेव्हा पोहोचला तेव्हा त्याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळ हत्यारं किंवा स्फोटकं आढळली नाही. याबाबतची सर्व माहिती दिल्ली पोलिसांकडे आहे. आमची एक टीम जाणार असून दिल्ली पोलिसांकडून माहिती घेईल. तसेच आमच्याकडे जी माहिती आहे ती आम्ही दिल्ली पोलिसांना देऊ. त्यानंतर पुढील तपास करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मुंबईत रेकी केली नव्हती
1000 हजार लोक आमच्या रडारवर आहेत. आम्ही सतत दिल्ली पोलिसांच्या संपर्कात आहोत. मुंबईत रेकी केली नव्हती, मुंबईमध्ये रेकी केली जाईल, असा अंदाज होता, असे अगरवाल यांनी स्पष्ट केले. तसेच याप्रकरणी आमच्याकडे जी काही माहिती आहे ती आम्ही दिल्ली पोलिसांना देऊ. अजून आम्हाला एफआयआर मिळालेला नाही. तो आल्यावर कारवाईचे ठरवू, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय एकही दहशतवादी किंवा त्यांचा साथीदार मुंबईत आला नाही, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top