Friday, 18 Oct, 9.22 am प्रभात

मुखपृष्ठ
दिलीप मोहितेंच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजगुरूनगरातील आठवडे बाजाराची संधी साधून मतदारांशी साधला संवाद

राजगुरूनगर- शहरातील आठवडे बाजारातून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पदयात्रा काढून बाजारकरी व व्यापारी, स्थानिक नागरिक यांच्याशी संवाद साधला. या पदायात्रेला मोठा प्रतिसाद लाभला.

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ राजगुरूनगर शहरातून आज पदयात्रा काढण्यात आली. येथील शनी मंदिरात जाऊन मोहिते पाटील यांनी दर्शन घेऊन पदायात्रेला सुरुवात केली. राजगुरूनगरचा शुक्रवारी (दि. 18) बाजार असल्याने तालुक्‍यातील मोठा शेतकरीवर्ग आज बाजारात येतो. याबरोबरच तालुक्‍यातील कानाकोपऱ्यातील छोटे-मोठे व्यापारी येथे बाजारात येतात. आजची बाजाराची येथील ही नामी संधी साधून बाजारातून दिलीप मोहिते यांनी पदयात्रा काढून बाजारकरी मतदारांशी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. आठवडे बाजारातून त्यांनी स्थनिक नागरिकांच्या 'घर टू घर' दौरा काढून संवाद साधला. यावेळी त्यांना मोठा प्रतिसाद नागरिकांनी-मतदारांनी दिला.

याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, राजगुरूनगर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे, राज्य युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रतीक मोहिते पाटील, बाजार समितीचे संचालक बाबा राक्षे, विनायक घुमटकर, अशोक राक्षे, दशरथ गाडे, राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या संचालिका हेमलता टाकळकर, शांताराम चव्हाण, माउली ढमाले, वैभव नाईकरे, सुनील थिगळे सुभाष होले, यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

  • शहरातील विकास कामे प्रलंबित आहे पाणी वीज आणि रस्ते गटार आणि कचरा व्यवस्थापन हे प्रश्‍न प्रलंबित आहेत. शिवसेना-भाजपचे सरकार केंद्रासह राज्यात असताना मागील पाच वर्षांत हे प्रश्‍न सुटणे अपेक्षित होते; मात्र ते सुटले नाहीत. ते सोडविण्यासाठी दिलीप मोहिते पाटील यांचा मागे ठामपणे उभे राहावे. तालुक्‍यातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याने दिलीप मोहिते हेच पुन्हा आमदार होणार आहेत, आसा विश्‍वास आहे.
    - सुभाष होले, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, राजगुरूनगर
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top