Thursday, 27 Feb, 11.05 am प्रभात

मुखपृष्ठ
दिशाहीन

बॉलीवूडची चर्चित अभिनेत्री दिशा पटानीचा 'मलंग' हा नवा चित्रपटही प्रेक्षकांना फारसा प्रभावित करू शकलेला नाही. पण नेहमीप्रमाणेच याही चित्रपटातील दिशाच्या बोल्ड अँड हॉट लूकची चर्चा आणि प्रशंसा होत आहे. तसेही दिशा सध्या आपल्या खासगी आयुष्यातील नातेसंबंधांबाबत जरा जास्तच बोल्ड झालेली दिसत आहे. पण यामुळेच तिचे करिअर दिशाहीन झालेले आहे, असे टीकाकारांचे म्हणणे आहे.

#3DaysForMalang #7thFebWithMalang @anilskapoor @adityaroykapur @khemster2 @mohitsuri #LuvRanjan @gargankur82 @bhushankumar @jayshewakramani @luv_films @tseries.official @tseriesfilms @malangfilm

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on Feb 4, 2020 at 4:57am PST

#T20WorldCup : दक्षिण-आफ्रिका महिला संघाचा थायलंडवर ११३…

महात्मा ते राजीव गांधी….सर्वांपेक्षा मोदीच श्रेष्ठ

खासगी आयुष्याचा विचार करता ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे की, दिशा आणि टायगर हे प्रियकर-प्रेयसी म्हणून सुप्रसिद्ध झाले आहेत. पण तरीही हे दोघे एकमेकांच्या नात्याबाबत जराही बोलायला तयार नसतात. यादरम्यानच आता अशी चर्चा सुरु झाली आहे की, 'मलंग' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिशाला आदित्य रॉय कपूरच्या व्यक्‍तिमत्त्वाने मोहिनी घातली आहे. वास्तविक, या बातमीचे एका क्षणात खंडनही करता आले असते, पण त्याचे झाले असे की एके ठिकाणी टायगरच्या नावाचा उल्लेख झाल्यानंतर दिशाने तोंड वाकडे करुन उत्तर दिले.

#malang promotions ❤️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on Feb 2, 2020 at 3:49am PST

मीडियाने तिला टायगरसोबतच्या नात्याविषयीचा प्रश्‍न विचारला होता. त्यावर दिशानं तोंड वाकडे करत 'कसले नाते..?' असा प्रतिप्रश्‍न केला. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे होते की, कोण टायगर, माझं त्याच्याशी का नातं असेल…. त्याच वेळी आदित्यविषयी विचारले असता दिशाबाई भरभरून बोलू लागल्या. आता यावरुन आम्हला काय समजायचं ते समजलं. टायगरबाबा तुला समजतंय का ते बघ !

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top