Dailyhunt
डोनाल्ड ट्रम्प यांना समर्थकांची घोषणाबाजी पडणार महागात

डोनाल्ड ट्रम्प यांना समर्थकांची घोषणाबाजी पडणार महागात

प्रभात 5 years ago

वाॅशिंग्टन - ट्रम्प यांच्या समर्थकांनी 6 जानेवारीला कॅपिटोलमध्ये जो धुडगूस घातला होता. त्यावेळी ज्या घोषणा दिल्या होत्या, त्याच आता ट्रम्प यांना महागात पडण्याची शक्‍यता आहे.

ट्रम्प समर्थकांनी दिलेल्या घोषणा हाच ट्रम्प यांच्याविरोधातील पुरावा ठरण्याची शक्‍यता आहे. 6 जानेवारीला कॅपिटल हिलवर मोर्चा काढला तेव्हा तत्कालीन अध्यक्षांकडून ऑर्डर मिळाल्याचे फेडरल चार्जेस सामोरे जाणाऱ्या किमान पाच समर्थकांनी सांगितले आहे.

ट्रम्प समर्थकांच्या प्रतिक्रिया टिव्ही पत्रकारांच्या कॅमेऱ्यातही कैद झाल्या आहेत. त्यामुळे कॅपिटॉल हिलवरील हिंसाचाराला ट्रम्प यांचीच चिथावणी होती, हे सिद्ध झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat