Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ड्रग्जशी देणंघेणं नाही सुशांतसोबत काय घडलं ते सांगा?

ड्रग्जशी देणंघेणं नाही सुशांतसोबत काय घडलं ते सांगा?

प्रभात 6 years ago

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाला अंमली पदार्थ रॅकेटची किनार असल्याचं स्पष्ट झालंय. बॉलिवूडमधील या ड्रग्ज रॅकेटची आता अंमली पदार्थ विरोधी पथक अर्थात एनसीबीकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. मात्र, या सर्व चौकशी दरम्यान सुशांतसोबत काय घडलं होतं ते अजूनही समोर आलं नाही.

दरम्यान, याच पार्श्ववभूमीवर अभिनेते शेखर सुमन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'ड्रग्ज घेणाऱ्यांना मरु द्या, त्यांना जेलमध्ये टाका, त्यांना देशातून बाहेर काढा, त्यांना चित्रपटातून बाहेर काढा, आम्हाला त्याचं काही देणघेणं नाही. फक्त सुशांतसोबत काय घडलं होतं ते सांगा? रुग्णवाहिकेचा चालक, नकाब वाली तरुणी?

कुठे गेली ही गँग काही तरी सांगा? असा शेखर सुमन यांनी सवाल केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केलं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat