Sunday, 07 Jun, 3.09 pm प्रभात

ताज्या बातम्या
दुचाकीला दोरीने बांधून श्वानाला नेले फरफटत ; माणुसकीला काळिमा फासणारी घटना

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका श्वानाला दुचाकीला दोरीने बांधून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

याप्रकरणी दोन अज्ञात दुचाकीस्वारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे. याबाबत सर्वत्र निषेध नोंदवला जात आहे. नुकतीच केरळ मध्ये हत्तीणीच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली होती. आणि त्याच्या मागोमाग हि घटना समोर आल्याने मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळल्या जाणाऱ्या अश्या निर्दयी कृत्याने माणुसकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे याप्रकरणी पालकमंत्री सुभाष देसाई, पोलीस महासंचालक यांना कारवाईचे आदेश दिलेले आहेत. घटनास्थळी पाहणी केली असता त्या श्वानाचे रक्ताळलेल्या पायाचे ठसे आणि डाग देखील दिसले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>