Dailyhunt
दुर्दैवी! इंडोनेशियामध्ये समुद्रात विमान कोसळले: 62 प्रवाशांना जलसमाधी ?

दुर्दैवी! इंडोनेशियामध्ये समुद्रात विमान कोसळले: 62 प्रवाशांना जलसमाधी ?

प्रभात 5 years ago

जकार्ता : इंडोनेशियामध्ये एका विमानाला जलसमाधी मिळाली असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून पॉण्टिआनलका जाणाऱ्या श्रीविजया एअरच्या देशांतर्गत विमानाचे उड्डाण झाल्यानंतर काही वेळातच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. प्रसारमाध्यामांच्या माहितीनुसार, उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या चार मिनिटांत विमान समुद्रात कोसळल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. या विमानात 50 प्रवाशी आणि 12 कर्मचारी होते. या सर्वांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

इंडोनेशियाचे परिवहन मंत्र्यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना, विमानातील लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.

ते म्हणाले की, मच्छिमारांना समुद्रात विमानाचे काही अवशेष मिळाले आहेत. तसेच शरीराचे अवयव, कपडे आणि इतर काही विमानातील गोष्टींही मिळाल्या आहेत. या सर्वांना पुढील तपासासाठी इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांकडे सपूर्द करण्यात आले आहे. यावरुन विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

इंडोनेशियाचे परिवहनमंत्री बुदी कारया सुमादी यांनी सांगितले की, एसजे 182 या विमानाने नियोजित वेळेपेक्षा एक तास विलंबाने म्हणजेच स्थानिक वेळेनुसार दोन वाजून 36 मिनिटांने उड्डाण केले. त्यानंतर चार मिनिटांनी हे विमान रडार यंत्रणेवरुन गायब झाले. त्यापूर्वी वैमानिकाने हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमान समुद्रसपाटीपासून 29 हजार फुटांवर असल्याचे कळविले होते, असे सुमादी यांनी सांगितले.

बोइंग 737-500 या विमानाचे 1:56 वाजता जकार्ताहून उड्डाण झाले आणि 2:40 वाजता त्या विमानाचा नियंत्रण मनोऱ्याशी संपर्क तुटला, असे इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या अदिता इरावती यांनी सांगितले.

जकार्ताच्या उत्तरेकडे असलेल्या लॅनकॅंग आणि लाकी बेटांमध्ये शोध आणि मदतकार्यासाठी चार युद्धनौकांसह 12 जहाजे तौनात करण्यात आली, असे सुमादी म्हणाले. तर मच्छीमारांना मिळालेले विमानाचे अवशेष आणि कपडे राष्ट्रीय शोध आणि मदतकार्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले असून ते राष्ट्रीय परिवहन सुरक्षा समितीकडे पुढील तपासासाठी सुपूर्द करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या उपग्रह यंत्रणेलाही बेपत्ता विमानाचे ईएलटी सिंग्नल पकडता आले नाही, असे आधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat