Saturday, 21 Sep, 1.39 am प्रभात

मुख्य पान
दूषित पाणी असणाऱ्या गावांत शुद्ध पाणी पुरवा

नगर - ज्या ग्रामपंचायत हद्दीत दूषित पाण्याचे नमुने आढळून आले आहेत त्यांनी शुध्दीकरणाच्या उपाययोजना राबवाव्यात व नागरिकांनी आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा अशा सूचना जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य समितीच्या सभापती राजश्रीताई घुले यांच्या अघ्यक्षतेखाली आरोग्य समितीची बैठक झाली.

समितीचे सदस्य सिताराम राऊत,रामभाऊ साळवे,नंदाताई गाढे,पंचशीलाताई गिरमकर यांनी विविध सूचना केल्या.यावेळी विविध राष्ट्रीय आरोग्य योजनांचा आढावा घेण्यात आला.किटकजन्य आजाराबाबत तसेच डेंग्यू आजारांबाबतच्या उपययोजना यावर चर्चा झाली. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाचे 51 टक्‍के काम पूर्ण झाले असून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णांलयामध्ये या शस्त्रक्रिया सुरु करण्याच्या सचना करण्यात आल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे,अतिरिक्‍त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह आरोग्य विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top