Sunday, 22 Sep, 7.38 am प्रभात

मुखपृष्ठ
एमआयएमची दुसरी यादी जाहीर

मुंबई: वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्याच बरोबर सांगोला आणि सोलापूरच्या दोन मतदार संघांमध्ये उमेदवार घोषित केले आहेत.

दरम्यान जलील यांनी 11 सप्टेंबरला विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये पुण्यातील वडगाव शेरी, नांदेड उत्तर आणि मालेगाव मध्य मतदारसंघांचा समावेश होता. तर दुसऱ्या यादीमध्ये सांगोला, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण आणि पुणे कॅन्टोन्मेंट या चार मतदारसंघांचा समावेश आहे. सांगोल्यातून शंकर सरगर, सोलापूर मध्यमध्ये फारूक शाब्दी, सोलापूर दक्षिणमध्ये सुफिया शेख आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून हिना मोमीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top