Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Evan Speechly Honor : विराट कोहलीही झाला भावुक; आरसीबीने १८ वर्षे सेवा देणाऱ्या 'या' दिग्गज व्यक्तीचा केला खास सन्मान

Evan Speechly Honor : विराट कोहलीही झाला भावुक; आरसीबीने १८ वर्षे सेवा देणाऱ्या 'या' दिग्गज व्यक्तीचा केला खास सन्मान

प्रभात 2 months ago

RCB honored their former head physiotherapist Evan Speechly : आयपीएलमध्ये जेव्हा एखाद्या खेळाडूची एकाच संघासोबतच्या दीर्घ प्रवासाविषयी चर्चा होते, तेव्हा विराट कोहलीचे नाव सर्वात आधी घेतले जाते.

मात्र, खेळाडूव्यतिरिक्त सपोर्ट स्टाफमध्येही अशी एक व्यक्ती आहे, जी तब्बल १८ वर्षे आरसीबी (RCB) सोबत एकनिष्ठ राहिली. ती व्यक्ती म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे प्रसिद्ध स्पोर्ट्स फिजियोथेरेपिस्ट इव्हान स्पीचली (Evan Speechly). स्पीचली यांनी सपोर्ट स्टाफ म्हणून १८ वर्षे संघाची सेवा केली असून, आयपीएल २०२६ च्या दरम्यान आरसीबीने त्यांचा विशेष सन्मान केला आहे.

१८ वर्षांचा मोठा प्रवास –

आयपीएलच्या पहिल्या पर्वात (२००८) आरसीबीने इव्हान स्पीचली यांची मुख्य फिजियोथेरेपिस्ट म्हणून नियुक्ती केली होती. विराट कोहलीप्रमाणेच स्पीचली हे आरसीबीचे एक महत्त्वाचे अंग बनले होते. त्यांचा हा मोठा प्रवास २०२५ मध्ये आरसीबीच्या पहिल्या आयपीएल जेतेपदासोबत संपला. त्यानंतर ते आयपीएलच्या कोणत्याही संघाचा भाग नसले, तरी त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांना आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी आरसीबीने त्यांना एक खास रिस्ट वॉच देऊन सन्मानित केले. या भावनिक क्षणी विराट कोहलीने स्पीचली यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. कोहली म्हणाला की, आरसीबीच्या या १८ वर्षांच्या प्रवासात त्याने जितका वेळ स्पीचली, बासु आणि माने काका यांच्यासोबत घालवला, तितका वेळ कदाचित अन्य कोणासोबतही घालवला नाही.

– IPL 2026 Playoffs : आयपीएल २०२६ प्लेऑफ्सच्या शर्यतीत जबरदस्त चुरस; कोणता संघ मारणार बाजी अन् कुणाचा प्रवास संपुष्टायत येणार? जाणून घ्या

टीम इंडियाशीही राहिले कनेक्शन –

इव्हान स्पीचली यांचे योगदान केवळ आरसीबीपुरते मर्यादित नव्हते. ऑक्टोबर २०११ ते फेब्रुवारी २०१३ या काळात बीसीसीआयने त्यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य फिजियोथेरेपिस्टपदीही नियुक्ती केली होती. क्रिकेटशी जोडले जाण्यापूर्वी, स्पीचली यांनी दोन दशके दक्षिण आफ्रिकेच्या फुटबॉल आणि रग्बी संघांचे फिजियो म्हणूनही काम पाहिले होते. अशा या दिग्गज तज्ज्ञाचा सन्मान करून आरसीबीने खेळाडूंप्रमाणेच सपोर्ट स्टाफचे योगदानही किती मोलाचे असते, हे दाखवून दिले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat