Dailyhunt
Fake Baba Arrested : खालापूर हादरलं! भोंदू बाबाचा अघोरी विधीच्या नावाखाली महिलांवर अत्याचार

Fake Baba Arrested : खालापूर हादरलं! भोंदू बाबाचा अघोरी विधीच्या नावाखाली महिलांवर अत्याचार

Fake Baba Arrested - रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात एका भोंदू बाबाकडून महिलांची फसवणूक आणि अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सांताक्रूझ (मुंबई) येथील पीडित महिलेच्या तक्रारीवरून खालापूर पोलिसांनी अब्दुल रशीद उर्फ बाबाजान (रा.

कळंबोली, नवी मुंबई) याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला वैयक्तिक समस्येवर उपाय शोधण्यासाठी आरोपीकडे गेली होती.

मात्र अघोरी विधी आणि काळी जादूच्या नावाखाली आरोपीने तिचा विश्वास संपादन करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा प्रकार खालापूर तालुक्यातील महड येथील एका निर्जन फार्महाऊसमध्ये घडल्याचे समोर आले आहे. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, आरोपी लोकांच्या वैयक्तिक, आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी सोडवण्याचे आश्वासन देत त्यांना जाळ्यात ओढत होता. गोड बोलून किंवा भीती दाखवून विशेषतः महिलांना एकांत ठिकाणी बोलावून गैरप्रकार करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

विरोध केल्यास जादूटोण्याची भीती आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान कळंबोली परिसरातही अशाच प्रकारे काही महिलांची फसवणूक करत अत्याचार केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. दोन महिलांनी याबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून आणखी पीडित पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस अधिक तपास करत असून, अशा भोंदूगिरीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat