Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Farmer Loan : मोठी अपडेट..! राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पहिली यादी जाहीर, अहिल्यानगर अव्वल

Farmer Loan : मोठी अपडेट..! राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पहिली यादी जाहीर, अहिल्यानगर अव्वल

प्रभात 1 month ago

Farmer Loan : राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आल्याची माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.

या योजनेच्या पहिल्या लाभार्थी यादीची घोषणा करण्यात आली असून, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक 1 लाख 32 हजार 634 शेतकरी पात्र ठरले आहेत. (Farmer Loan)

राज्य सरकारने या योजनेद्वारे टप्प्याटप्प्याने सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. संपूर्ण योजनेसाठी 36 हजार 585 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (Farmer Loan)

13,600 कोटी रुपयांची कर्जमाफी

सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 13 हजार 600 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे.

जिल्हानिहाय लाभार्थ्यांमध्ये:

अहिल्यानगर - 1,32,634 शेतकरी
जालना - सुमारे 1.60 लाख शेतकरी
बुलढाणा - 1.16 लाख शेतकरी
छत्रपती संभाजीनगर - 1.05 लाख शेतकरी
यवतमाळ - 1.01 लाख शेतकरी
सिंधुदुर्ग - 3,708 शेतकरी (सर्वात कमी)

राज्यातील सहा जिल्ह्यांत एक लाखांहून अधिक लाभार्थी असल्याचेही तावरे यांनी सांगितले.

दुसरी यादी दोन आठवड्यांत

सहकार आयुक्तांनी सांगितले की, कर्जमाफीची दुसरी यादी पुढील दोन आठवड्यांत जाहीर केली जाईल. तसेच संपूर्ण कर्जमाफी प्रक्रिया पुढील महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. (Farmer Loan)

शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र लवकरच वितरित करण्यात येईल. हे प्रमाणपत्र आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Farmer Loan)

कर्जमाफीच्या यादीवर शेतकऱ्यांचे प्रश्न

दरम्यान, काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या यादीत गोंधळ असल्याचा आरोप केला आहे. विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील गंधोरा गावातील काही शेतकऱ्यांनी, दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा असतानाही प्रत्यक्षात संपूर्ण लाभ मिळत नसल्याचा दावा केला आहे. (Farmer Loan)

यावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, दोन लाख रुपयांपर्यंत पात्र कर्ज असल्यास शेतकऱ्यांनी घाईने परतफेड करू नये. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या पूर्ण केल्यानंतर पात्र लाभ दिला जाईल. तसेच दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही परतफेडीसाठी मुदत दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (Farmer Loan)

राज्य सरकारकडून उर्वरित लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच जाहीर होणार असून, पात्र शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Farmer Loan)

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या कामाची बातमी.! ‘शेतकरी कर्जमाफी’ योजने बद्दल सर्वात मोठी अपडेट समोर

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीबाबत संभ्रम? पात्रतेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat