Gautam Gambhir Tenure Indian Test Legends Retirement Kohli Rohit Pujara Ashwin Dhawan Ajinkya : भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने ३० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली.
तीन वर्षे संघबाहेर राहिल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला. रहाणेच्या या निर्णयामुळे भारतीय कसोटी क्रिकेटला नवी उंची मिळवून देणाऱ्या एका सुवर्ण पिढीचा अधिकृत शेवट झाला आहे. मुख्य म्हणजे, गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यापासून आतापर्यंत कसोटी क्रिकेटमधील तब्बल ६ दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे.
गौतम गंभीर यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारल्यापासून सहा खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे, ज्यामध्ये अनुक्रम शिखर धवन, आर. अश्विन, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. या सर्व सहा खेळाडूंपैकी चार खेळाडू कसोटी क्रिकेटचे प्रमुख शिलेदार मानले जात होते.
भारतीय कसोटी क्रिकेटचे हे ६ शिलेदार निवृत्त:
शिखर धवन (ऑगस्ट २०२४): २०१३ पासून तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा मुख्य सलामीवीर असलेल्या गब्बरने सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. (३४ कसोटी).
आर. अश्विन (२०२४): ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान या महान ऑफस्पिनरने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. त्याने १०६ कसोटींत ५३७ विकेट्स घेतल्या.
चेतेश्वर पुजारा (ऑगस्ट २०२५): राहुल द्रविडनंतर भारताची नवी भिंत बनलेल्या पुजाराने १०३ कसोटींत ७,१९५ धावा कुटल्यानंतर क्रिकेट सोडले.
रोहित शर्मा (मे २०२५): टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या विजयानंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या रोहितने मे २०२५ मध्ये कसोटी क्रिकेटलाही रामराम ठोकला. तो सध्या फक्त वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. (६७ कसोटी).
विराट कोहली (मे २०२५): भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार विराटनेही मे २०२५ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यान कसोटीसह टी-२० क्रिकेटमधून पण निवृत्ती घेतली आहे. तो सध्या वनडे क्रिकेटमध्ये खेळत आहे. (१२३ कसोटी).
अजिंक्य रहाणे (३० जुलै २०२६): २०१३ मध्ये पदार्पण करणाऱ्या अजिंक्य रहाणेने ८५ कसोटी खेळल्या. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक २-१ असा विजय मिळवला होता.

