Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गरीब आणि कामगारांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

गरीब आणि कामगारांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

प्रभात 6 years ago

नवी दिल्ली- गरीबांसाठी, कामगारांना तात्काळ मदत देण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांना मदत देण्यासाठी 1.70 लाख कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करत आहे. हे पैसे नागरिकांच्या थेट खात्यामध्ये टाकण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. पत्रकार परिषद घेत त्यांनी ही घोषणा केली.

कोरोना व्हायरसमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी मोदी सरकारने तब्बल 1.70 लाख कोटी रुपयाचे प्रोत्साहन पॅकेज दिले आहे. या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि आरबीआय यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

दरम्यान, हा निधी तब्बल 10 कोटी लोकांच्या थेट बँके खात्यात वळविण्यात येणार आहे.

तसेच लॉकडाऊनमुळे परिणाम झालेल्या व्यवसायांना मदत करण्यासाठी वापरला जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat