Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Gas cylinde price : ऑगस्ट महिना सुरू होताच खुशखबर.! सिलिंडर १९२ रुपयांनी स्‍वस्‍त झाला

Gas cylinde price : ऑगस्ट महिना सुरू होताच खुशखबर.! सिलिंडर १९२ रुपयांनी स्‍वस्‍त झाला

Gas cylinde price - ऑगस्ट महिन्‍याच्‍या सुरूवातीला व्‍यावसायिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मागील बरेच महिने महागाईचा झटका सुरु असताना तेल विपणन कंपन्यांकडून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्‍या दरात १९२ रुपयांची मोठी कपात करण्‍यात आली आहे.

त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बेंचमार्क दरांमधील बदलांनुसार विमान इंधनाच्या दरात प्रति लिटर ५ रुपयांची वाढ करण्यात आली. दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत २,९३० रुपयांवरून २,७३८ रुपयांवर कमी झाली आहे.

दरम्‍यान, फेब्रुवारीच्या उत्तरार्धात अमेरिका-इराण युद्ध सुरू झाल्यानंतर व्यावसायिक सिलिंडर फेब्रुवारीमधील १,७४०.५० रुपयांवरून जूनमध्ये ते ३,११३.५० रुपयांपर्यंत पोहोचले होते.

सर्वसामान्यांच्या १४.२ किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दराकडे लागल्या होत्या. मात्र, कंपन्यांनी घरगुती गॅसचे दर स्थिर ठेवले आहेत. त्यात कोणतेही बदल केले नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat