Dailyhunt
Gas Cylinder Scam : एजन्सी होणार रद्द? ग्राहकांच्या रोषानंतर विक्रम गॅसवर मोठी कारवाई, पाहा काय आहे प्रकरण

Gas Cylinder Scam : एजन्सी होणार रद्द? ग्राहकांच्या रोषानंतर विक्रम गॅसवर मोठी कारवाई, पाहा काय आहे प्रकरण

प्रभात 2 weeks ago

Gas Cylinder Scam - विक्रम गॅस एजन्सीला पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल चार लाख रुपयांचा दंड ठोठावला असून यापुढे कारभार न सुधारल्यास एजन्सी रद्द करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिला आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या गॅस पुरवठा थोडा विस्कळीत झाला होता. मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून तो पुरवठा सुरळीत केला असताना विक्रम गॅस एजन्सी कार्यालयाजवळ ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे.

लोक गॅस सिलिंडरसाठी वीस ते पंचवीस किलोमीटरवरून सकाळी आठ वाजल्यापासून रांगेत उभे रहात आहेत. तरीही गॅस एजन्सीचे अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना व्यवस्थित उत्तरे देत नाहीत उलट आरेतूरे बोलत आहेत. याबाबत अनेकांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला व हकीकत सांगितली. यामध्ये अनेकांचा गॅस सिलेंडरचा नंबर लाऊन तब्बल एक महिना झाला तरीही गॅस सिलेंडर मिळाला नाही, तसेच अनेकांच्या गॅस सिलिंडरच्या टाक्या इतरांना दोन हजार रुपये किमतीला विकल्याची माहिती ग्राहकांनी दिली.

त्याचा बरोबर काही टाक्या व्यावसायिक लोकांना त्यातील गॅस व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये भरून देत आहेत. तसेच काही टाक्यातील गॅस काढून घेतले जात असल्याचे दिसून येत असून 14.5 किलो वजन असल्या तरी त्यात 10 किलोच गॅस आढळत असून वजन कमी असल्याचे दिसून आले तरीही वजन करून देत नाहीत.

यामुळे विक्रम गॅस एजन्सी मुजोरीने ग्राहक वैतागले असून आज बुधवारी सकाळी ग्राहकांनी कार्यालयाला टाळे बघून कार्यालय पेटवण्याची धमकी दिली. मात्र त्यानंतर पुरवठा शाखेचे अधिकारी कांबळे यांनी भेट देत चांगलीच एजन्सीची खरडपट्टी काढली व सुधारणा करा व ग्राहकांना गॅस सिलिंडर द्यावा अन्यथा पुन्हा दंडात्मक कारवाई करण्याची लेखी सूचना दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat