Dailyhunt
Gaurav More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेचे चाहत्यांना सरप्राईज; खऱ्या आयुष्यात गुपचुप उरकले लग्न?

Gaurav More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेचे चाहत्यांना सरप्राईज; खऱ्या आयुष्यात गुपचुप उरकले लग्न?

Gaurav More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमुळे गौरव मोरेला मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र आता त्याने चाहत्यांना मोठे सरप्राइज दिले आहे. गौरव मोरेने खऱ्या आयुष्यात लग्न केल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने शेअर केलेल्या फोटोमुळे गौरवने लग्नगाठ बांधल्याचं समोर आले आहे.

खऱ्या आयुष्यात गौरवने त्याची गर्लफ्रेंड प्रियंका कारेकर हिच्यासोबत लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. गौरवने स्वतः अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत पोस्ट शेअर केलेली नाही. मात्र, त्याची जवळची मैत्रीण व मराठी मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे हा गौप्यस्फोट झाला आहे. Gaurav More

विशेष म्हणजे, ऋतुजाने 'Mr & Mrs मोरे ' असं कॅप्शनही या फोटोवर दिलं आहे. त्यामुळे गौरवने लग्न केल्याचे कन्फर्म झालं. गौरवने अत्यंत साध्या पद्धतीने आणि कोणालाही थांगपत्ता लागू न देता लग्न केल्याने त्याच्या चाहत्यांना चांगलंच सरप्राईज दिलं.

या फोटोमध्ये गौरवची बायको साडी हातात चुडा, गळ्यात मंगळसूत्र अशा वेषात दिसतेय. गौरव तिच्या बाजूला उभारलाय. ऋतुजाने या दोघांसोबत फोटो काढत तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "मिस्टर अँड मिसेस मोरे, तुमच्या या नवीन प्रवासासाठी आणि सुंदर नवीन घरासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन! 'करू' आणि 'बच्ची', गॉड ब्लेस यू." गौरवने फक्त लग्नच नाही, तर आपल्या हक्काच्या नव्या घरात गृहप्रवेशही केला. Gaurav More

दरम्यान, गौरव मोरेची (Gaurav More) पत्नी प्रियंकाही मनोरंजन विश्वातीलच आहे. तिने साऊथ सुपरस्टार दुलकर सलमानसोबत स्क्रीन शेअर केली आहे. आर. बालकी दिग्दर्शित 'चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' या २०२२ साली रिलीज झालेल्या हिंदी चित्रपटात प्रियंकाने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

या चित्रपटात सनी देओल, दुलकर सलमान, अमिताभ बच्चन आणि पूजा भट्ट सारखे दिग्गज कलाकार होते. Gaurav More

Rajya Sabha Oath : नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा आज शपथविधी सोहळा; शरद पवारांसह 'हे' नेते घेणार खासदारकीची शपथ

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat