Dailyhunt
गिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार

गिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार

प्रभात 5 years ago

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या लष्कराचा ताबा असलेल्या गिलगीट-बाल्टिस्तान प्रांताच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीसाठी बोलावलेल्या बैठकीवर पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी संसदेचे सभापती असाद कैसर यांनी देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय सर्व विरोधी पक्षांच्या आघाडीने घेतला आहे.

जमैत उलेमा इस्लाम पक्षाचे प्रमुख मौलना फजलूर रेहमान यांनी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली आणि इम्रान खान यांचे सरकार खाली खेचण्याच्या रणनितीविषयी चर्चा केली. त्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो - झरदारी यांनी विरोधकांच्या या निर्णयाची घोषणा केली.

संसदेचे सभापती आणि सर्व प्रांतीय मंत्र्यांना गिलगीट-बाल्टिस्तानमधील निवडणुकांशी काहीही घेणे देणे नाही.

गिलगीट-बाल्टिस्तानमध्ये 15 नोव्हेंबरला प्रांतीय निवडणूक घेतल्या जातील, असे पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. मात्र गिलगीट-बाल्टिस्तान हा भाग पाकिस्तानने बेकायदेशीर बळकावलेला भारताचा भाग असल्याने तेथे निवडणुका घेण्याचा पाकिस्तानला काहीही अधिकार नसल्याचे भारताने म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat