Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गो करोना. गो. घोषणानंतर रामदास आठवले म्हणाले.

गो करोना. गो. घोषणानंतर रामदास आठवले म्हणाले.

प्रभात 6 years ago

मुंबई - भारतामध्ये एकीकडे 37 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन आज घरी जाणार आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. आज कोरोनाचे आणखी 4 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. पुण्यात 3 तर साताऱ्यामध्ये कोरोनाचा 1 असे चार नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 101 झाली आहे.

दरम्यान, कोरोनाविरोधात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चक्क घोषणा दिल्या. आठवले यांनी भारत-चीन संबंध सुदृढ राहोत असे म्हणत 'गो करोना. गो. गो करोना. गो' अशा घोषणा होत्या तर आता आठवले यांनी सर्वांना सरकारच्या निर्देशाचं पालन. तसंच योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

'योग्य ती काळजी, सरकारच्या आदेशाचं पालन आणि घरात राहून करोनाचा आपण अंत करू शकतो.

मी जो कँडल मार्च काढला होता आणि ज्या घोषणा दिल्या होत्या, तो सांकेतिक प्रयत्न होता. यातून समाजात जनजागृती करण हा उद्देश होता. लोकांमध्ये आजही याची चर्चा होत आहे, हे चांगलं आहे. सर्वांनाच योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे,' असं रामदास आठवले म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat