Thursday, 08 Apr, 3.53 pm प्रभात

मुखपृष्ठ
गोठवलेल्या भ्रुणवर हक्क कुणाचा

वॉशिंग्टन - सर्वसाधारणपणे पती आणि पत्नी यांच्या मध्ये जर घटस्फोट होणार असेल तर नंतरच्या प्रक्रियेमध्ये मालमत्तेचे वाटप आणि पैशाचे वाटप कसे करायचे हाच मुख्य वादाचा मुद्दा असू शकतो पण अमेरिकेच्या न्यायालयात घटस्फोटाचा खटल्यांमध्ये गोठवलेल्या भ्रुणवर कुणाचा हक्क आहे यावरून वाद सुरू झाला आहे.

आत्तापर्यंत ज्या मुलाचा जन्मही झाला नाही त्या मुलावर दोघेही पती-पत्नी आपला हक्क सांगत आहेत अमेरिकेत अशा प्रकारे भ्रुण गोठवून ठेवण्याची प्रक्रिया सर्वसंमत आहे पण आता लॉकडाउनच्या काळामध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालल्याने या गोठवून ठेवले भृणावर कोणाचा हक्क आहे याबाबत नवनवीन वाद समोर येत आहेत.

प्रख्यात अभिनेत्री सोफिया व्हर्गरा आणि तिचा माजी प्रियकर निक लोबे यांच्या खटल्यांमध्ये न्यायालयाने नीक च्या विरोधात निकाल दिला होता निकने न्यायालयात या भ्रूणावर आपला हक्क असून तो आपल्या ताब्यात दिला जावा अशी मागणी केली होती पण ती फेटाळण्यात आली.

जेव्हा अशा प्रकारचे भ्रुण गोठण्याची प्रक्रिया पूर्ण केली जातील तेव्हा जी कागदपत्रे तयार केले जातात त्यामध्ये कधीही एका पार्टनरचा मृत्यू झाला तर भ्रूणाचा ताबा कोणाकडे दिला जाईल याबाबत काहीही तपशील नसतो किंवा दोघे जोडीदार अलग होणार असतील तर भ्रूणाचा ताबा कोणाकडे दिला जावा या बाबत कोणता तपशील करार पत्रात नसतो त्यामुळेच अशा प्रकारचे अनेक दावे समोर येत आहेत.

अमेरिकेमध्ये गेल्या वर्षभराचा कालावधी मध्ये आय व्ही एफ पद्धतीने मुलाला जन्म देण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे या पद्धतीत नेहमीच भ्रुण गोठवून ठेवला जातो सध्या नॉक्स व्हीले येथील एम्ब्रियो डोनेशन सेंटरमध्ये 10 ते 13 लाख भ्रुण गोठवलेल्या स्थितीत आहेत. पती-पत्नी किंवा जोडीदारांनी करार करताना त्यामध्ये योग्य तरतुदी केल्या असतील तरच योग्य व्यक्तीला भ्रूणाचा ताबा दिल्या जाईल अशी भूमिका आता न्यायालयाने घेतली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top