Saturday, 23 Jan, 3.48 pm प्रभात

ताज्या बातम्या
Government Job ! राज्यात नोकरभरतीला सुरूवात; पाहा कोणत्या विभागात किती पदांवर भरती

मुंबई - अखेर राज्यात नोकरभरतीला सुरूवात झाली आहे. शनिवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी महाविकासआघाडी सरकारने राज्यात टप्प्याटप्प्याने नोकरभरती प्रक्रियेला सुरूवात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. अखेर ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जाणून घ्या कोणत्या विभागात किती पदांवर भरती.

महाभरती प्रक्रियेअंतर्गत गृहविभागात 5 हजार 297 जागांसाठी भरती होणार असून या प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 231 पदांसाठी भरती होणार आहे. तर आरोग्य विभाग आणि गृह विभाग अशी तब्बल 13 हजार 800 पदांची पहिल्या टप्प्यांत भरती होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारीला आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया राज्यात एकाच वेळी होणार आहे. मराठा समाजाच्या प्रवर्गातून अर्ज केलेल्या अर्जदारांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून नव्याने प्रमाणपत्र घेऊन पुन्हा ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top