मुखपृष्ठ
गुरू गोविंद सिंह यांच्या आदर्शांवर देशाची प्रगती सुरू - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - गुरु गोविंद सिंह जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे. पंतप्रधानांनी याप्रसंगी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण या अंतर्गत 6 लाख लाभार्थ्यांना दूरदृष्य प्रणालीद्वारे आर्थिक मदत जारी करताना ते आज बोलत होते.
पंतप्रधानांनी लाभार्थ्यांचे अभिनंदन केले आणि प्रकाश पर्वानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. गुरु गोविंद सिंह यांची आपल्यावर कृपा राहिली आणि त्यांनी आपल्याला सेवा करण्यासाठी मोठी संधी दिली, अशा भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केल्या.
गुरु गोविंद सिंह यांचे जीवन आणि त्यांनी दिलेला संदेश आपल्याला सेवा आणि सत्याच्या मार्गावरून जात असताना येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रेरणा देतात. सेवा आणि सत्य या भावनेतून हे सामर्थ्य आणि धैर्य निर्माण होते आणि गुरु गोविंद सिंह यांनी दाखविलेल्या याच मार्गावरून देश पुढे वाटचाल करत आहे, असे मोदी म्हणाले.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
related stories
-
ताज्या बातम्या विदुर नीति कशाला म्हणतात? त्यात नेमके काय सांगितले आहे, जाणून घ्या.
-
ताज्या बातम्या PM मोदी यांना आणखी एक मोठा सन्मान मिळाला, यांना जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण...
-
मुख्य बातमी उद्धवजी घाबरता कशाला आणि कोणाला ?