Wednesday, 15 Sep, 9.08 am प्रभात

ताज्या बातम्या
ज्ञानदीप लावू जगी : तरी घरीं मातापितरां

तरी घरीं मातापितरां । धड बोली नाहीं संसारा । येर विश्‍व भरी आदरा । मूर्खु जैसा ।। 595 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय अठरावा मनुष्याच्या जीवनामध्ये आईवडिलांचे स्थान हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण त्यांनी आपल्याला हे विश्‍व दाखवलेले असते.

प्रत्येक जण अनेक देवतांची भक्‍ती करत असतो. परंतु प्रत्येकाचे प्रथम दैवत हे आईवडील असतात. ज्ञानोबाराय म्हणतात, घरामध्ये जो आईवडिलांना आदर देत नाही आणि विश्‍वाला आदर देतो तो स्पष्टपणे मूर्ख आहे.

एवढेच नाही तर आईवडिलांना आदर न देणाऱ्याला जे लोक आदर देतात ते लोकही मूर्ख आहेत. विश्‍वातील सर्व तीर्थे आईवडिलांच्या चरणाजवळ असतात. म्हणून त्यांची सेवा हीच मनुष्याच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ भक्‍ती आहे.

कारण जगाच्या पाठीवरती नि:स्वार्थ प्रेम करणारे आईवडीलच असतात. लेकुराचे हित । वाहे माऊलीचे चित्त । ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविन प्रिती।।

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top