Dailyhunt
हिंगणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच विद्या थोरात यांचा सत्कार

हिंगणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच विद्या थोरात यांचा सत्कार

प्रभात 4 years ago

वाघोली - हिंगणगाव तालुका हवेली येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विद्या सागर थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांचा असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते प्रदिप वसंत कंद, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश वारघडे, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश शितोळे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष गावडे, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष मानसिंग गावडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष विजय वाळुंज, शिरसवडी गावचे उपसरपंच किरण शिंदे, सामाजिक कार्यकर्ते माऊली थोरात, विजय थोरात, कुंडलिक भाऊ थोरात, श्यामराव खलसे, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस योगेश थोरात, दादा बोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat