Dailyhunt
Hinjewadi IT Park area : हिंजवडी माण आयटी पार्क परिसरात २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित; रहिवाशांचे तीव्र आंदोलन

Hinjewadi IT Park area : हिंजवडी माण आयटी पार्क परिसरात २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित; रहिवाशांचे तीव्र आंदोलन

प्रभात 2 weeks ago

Hinjewadi IT Park area : हिंजवडी माण आयटी पार्क परिसरातील यशवीन सोसायटीमध्ये मागील २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे रहिवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सततच्या वीज खंडिततेमुळे पाणीपुरवठा, लिफ्ट सेवा, तसेच दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

या पार्श्वभूमीवर संतप्त रहिवाशांनी एकत्र येत वीज वितरण कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. "वीजपुरवठा त्वरित सुरू करा", "प्रशासन जागे व्हा" अशा घोषणा देत त्यांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेधही करण्यात आला.

वीज नसल्यामुळे 'वर्क फ्रॉम होम'चे कामकाज ठप्प (Hinjewadi IT Park area)

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, वारंवार तक्रारी करूनही संबंधित वीज वितरण कंपनीकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. विशेषतः आयटी पार्क परिसर असल्यामुळे अनेक जण 'वर्क फ्रॉम होम' करत असून, वीज नसल्यामुळे त्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. तसेच उष्णतेच्या तीव्रतेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

काही रहिवाशांनी सांगितले की, जनरेटरची मर्यादित सुविधा असल्यामुळे सर्वांना त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे अंधारातच रात्र काढावी लागत आहे. तसेच मोबाईल चार्जिंग व इंटरनेट सेवांवरही परिणाम झाला आहे.

रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण

दरम्यान, आंदोलनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात वीजपुरवठा केव्हा सुरू होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण कायम आहे.

“वारंवार होणाऱ्या वीजकपातीचा ‘यशविन सोसायटी’मधील सुमारे ३००० रहिवाशांना फटका बसत आहे. काल सकाळी ११ वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला आहे; याचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामावर जाणाऱ्या व्यावसायिकांवर होत असून, त्यांना आपले काम करणे अशक्य झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये. ही बाब पूर्णपणे अस्वीकार्य आहे”, अशा शब्दात बालाजी रंगनाथन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nana Patole : पार्थ पवार यांच्या 'डाऊनफॉल' विधानावर नाना पटोलेंची एकाच वाक्यात प्रतिक्रिया; विषयचं संपवला म्हणाले…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat