Dailyhunt
Hyundai: ह्युंदाईची भारतात 30 वर्षे पूर्ण; 45000 कोटींच्या नव्या गुंतवणुकीची घोषणा

Hyundai: ह्युंदाईची भारतात 30 वर्षे पूर्ण; 45000 कोटींच्या नव्या गुंतवणुकीची घोषणा

Hyundai: दक्षिण कोरियाची प्रमुख वाहन कंपनी ह्युंदाईने, देशात 30 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, भारत आणि जगासाठी वाहतूक व्यवस्था घडवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

6 मे 1996 रोजी स्थापित, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) ने स्थापनेपासून 40,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

उत्पादन, विद्युतीकरण, आणि 2030 पर्यंत 26 नवीन उत्पादने सादर करण्यासाठी 2026 ते 30 दरम्यान आणखी 45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे.

एचएमआयएलने स्थापनेपासून 1.35 कोटी वाहनांची विक्री केली. ज्यात भारतातील 96 लाख आणि 150 देशांमध्ये निर्यात केलेल्या 39 लाख वाहनांचा समावेश आहे. प्रवासी वाहनांचा भारतातील सर्वात मोठा निर्यातदार म्हणून, ह्युंदाईच्या जागतिक यशात भारताची भूमिका मजबूत होते, असे कंपनीचे यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग म्हणाले.

एचएमआयएलचे चेन्नई आणि पुणे येथे दोन उत्पादन प्रकल्प असून, 2028 पर्यंत एकूण वार्षिक उत्पादन क्षमता 10.74 लाख युनिट्सपर्यंत वाढवण्याची क्षमता आहे. सध्या देशभरात 1,025 शहरांमध्ये कंपनीचे 1,675 सेवा केंद्रे असून, 50,000 हून अधिक प्रशिक्षित सेवा व्यावसायिक कार्यरत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat