Monday, 13 Jul, 1.48 pm प्रभात

ताज्या बातम्या
ई-पासचा ऑनलाइन 'बाजार'

एकाला अटक : लॉकडाऊन काळात फायदा उठवण्याचा डाव

पुणे - लॉकडाऊन काळात फायदा उठविण्याच्या उद्देशाने एकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दीड हजारात पोलिसांचे ई-पास मिळवून देण्याची जाहिरात केली होती. याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी हडपसर येथून एकाला अटक केली. यासोबत त्याने आपल्या कॅब सेवेचीही जाहिरात केली होती. त्याने ई-पाससाठी वैद्यकीय प्रमाणपात्राचीही सोय केली जाईल, असे म्हटले होते.

गुन्हे शाखेने हडपसर पोलिसांना याची माहिती दिल्यावर पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जाधव यांनी महेश वाघमारे (30, रा. हडपसर) याला अटक केली. पुणे शहर गुन्हे शाखेचे सहायक उपनिरीक्षक शरद डडगे यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

जाधव म्हणाले, आरोपीने सोशल मीडियावर एक जाहिरात अपलोड केली. यात पुण्यात आणि पुण्याबाहेर ई-पाससह कॅबसेवा उपलब्ध आहे. त्याने आपला मोबाइल नंबर जाहिरातीमध्ये दिला. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जाहिरातीतील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला आणि वाघमारे यांनी ई-पास मिळवण्यासाठी 1500 रुपयांची रक्‍कम हस्तांतरित करण्यास सांगितले. यानंतर त्याने लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र दिले. आरोपी हा शहरात कॅबचा व्यवसाय करतो आणि येत्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये पैसे कमवण्याचे त्याने ठरविले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top