Friday, 02 Oct, 4.16 am प्रभात

ताज्या बातम्या
ईडीकडून तोयबाचा संस्थापक हाफिज सईदविरोधात आरोपपत्र

नवी दिल्ली - पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईद याच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले. दहशतवादासाठी पैसा पुरवण्याशी (टेरर फायनान्सिंग) संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ते पाऊल उचलण्यात आले.

टेरर फायनान्सिंग प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) याआधीच सईद आणि पाकिस्तानस्थित फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ते फाऊंडेशन सईद याच्याशीच संबंधित आहे. एनआयएच्या कारवाईची दखल घेऊन संबंधित प्रकरणात ईडीने चौकशी सुरू केली आहे. त्या प्रकरणात भारतीय नागरिक असणारा मोहम्मद सलमान आणि दिल्लीस्थित हवाला ऑपरेटर मोहम्मद सलीम उर्फ मामा यांच्याविरोधातही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्या दोघांना याआधीच अटक करण्यात आली आहे.

दहशतवादी कारवायांसाठी पैसा उपलब्ध करण्याच्या उद्देशातून फाऊंडेशनकडून निधी पाठवला जायचा. तो हवाला माध्यमातून सलमानपर्यंत पोहचायचा. संबंधित पैसा पाकिस्तानातून दुबईमार्गे भारतात पाठवला जायचा. संयुक्त राष्ट्रांनी याआधीच सईदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. त्याशिवाय, फाऊंडेशनचा समावेशही दहशतवादी संघटनांच्या यादीत करण्यात आला आहे

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top