Dailyhunt
International Booker Prize : लेखिका पद्मा विश्वनाथन यांच्या अनुवादाला आंतरराष्ट्रीय 'बुकर' पुरस्कारासाठी मानांकन

International Booker Prize : लेखिका पद्मा विश्वनाथन यांच्या अनुवादाला आंतरराष्ट्रीय 'बुकर' पुरस्कारासाठी मानांकन

प्रभात 2 weeks ago

International Booker Prize : भारतीय वंशाच्या कॅनेडियन-अमेरिकन लेखिका आणि अनुवादक पद्मा विश्वनाथन यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

२०२६ च्या प्रतिष्ठित 'आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारा'साठी जाहीर झालेल्या अंतिम सहा पुस्तकांच्या यादीत विश्वनाथन यांनी अनुवादित केलेल्या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.

ब्राझिलियन लेखिका आना पाउला माया यांच्या ‘ऑन अर्थ ॲज इट इज बिनीथ’ या मूळ पोर्तुगीज कादंबरीचा त्यांनी इंग्रजी अनुवाद केला असून, या साहित्यकृतीने जागतिक स्तरावर परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

निवड समितीच्या मते, ही कादंबरी ब्राझीलमधील एका दुर्गम तुरुंग वसाहतीतील मानवी संघर्षाचे आणि क्रूरतेचे दाहक वास्तव मांडते. जिथे न्याय आणि अमानवीयता यातील सीमारेषा पुसट होतात, अशा वातावरणाचे चित्रण यात अत्यंत प्रभावीपणे करण्यात आले आहे.

सध्या अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ आर्कान्सा येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या ५८ वर्षीय विश्वनाथन या नामांकित नाटककार आणि कादंबरीकार आहेत. त्यांच्या साहित्यकृती जगभरातील आठ देशांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत.

Raghav Chadha: राघव चड्ढा यांना मोठा धक्का ; AAP कडून राज्यसभेतील उपनेते पदावरून हकालपट्टी

50 हजार पौंडांचा हा वार्षिक पुरस्कार लेखक आणि अनुवादक यांच्यात समप्रमाणात विभागला जातो. गेल्या वर्षी भारतीय लेखिका बानू मुश्ताक आणि अनुवादक दीपा भास्ती यांनी हा बहुमान पटकावला होता.

अंतिम यादीत स्थान मिळवणाऱ्या प्रत्येक पुस्तकासाठी ५,००० पौंडांचे पारितोषिक निश्चित असून, त्याची विभागणीही लेखक व अनुवादकांमध्ये केली जाईल.

या जागतिक पुरस्काराच्या विजेत्याची घोषणा १९ मे रोजी लंडन येथील ‘टेट मॉडर्न’मध्ये होणाऱ्या भव्य सोहळ्यात केली जाणार आहे. जगभरातील साहित्यप्रेमींचे लक्ष आता या निकालाकडे लागले असून, पद्मा विश्वनाथन यांच्या निवडीमुळे भारतीय साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

अंतिम यादीत एकच पुरुष
यंदाच्या अंतिम यादीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये महिला लेखिका आणि अनुवादकांचे मोठे वर्चस्व दिसून येत आहे. निवड झालेल्या सहा पुस्तकांपैकी पाच पुस्तकांच्या लेखिका महिला आहेत.

या स्पर्धेत ब्राझीलसह बल्गेरिया, जर्मनी, तैवान, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम या देशांतील साहित्याचा समावेश आहे.

परीक्षक मंडळाच्या अध्यक्षा नताशा ब्राउन यांनी या निवडीबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, या कथांमध्ये जरी मानवी वेदना आणि एकाकीपणा असला, तरी त्यांचा एकूण प्रभाव वाचकाला समृद्ध करणारा आहे.

The Final Question Teaser : संजय दत्त एका वेगळ्या भूमिकेत! 'आखरी सवाल' सिनेमाचा दमदार टीझर रिली

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat