Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IPL Trophy Message : आयपीएलच्या चमचमत्या ट्रॉफीवर लिहिलेल्या 'त्या' संस्कृत वाक्याचा अर्थ काय? जाणून घ्या बीसीसीआयचा मूळ मंत्र

IPL Trophy Message : आयपीएलच्या चमचमत्या ट्रॉफीवर लिहिलेल्या 'त्या' संस्कृत वाक्याचा अर्थ काय? जाणून घ्या बीसीसीआयचा मूळ मंत्र

प्रभात 2 weeks ago

IPL Trophy Sanskrit Message Meaning RCB vs GT : आयपीएल २०२६ चा काऊंटडाऊन अखेर संपला असून, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात विजेतेपदासाठी महामुकाबला रंगणार आहे.

या ऐतिहासिक सामन्यात जो संघ जिंकेल, त्याच्या हातात आयपीएलची चमचमाती ट्रॉफी सोपवली जाईल. कोट्यवधी रुपयांची उधळण करणाऱ्या या लीगची ट्रॉफी तुम्ही अनेकदा पाहिली असेल, पण तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की, या ट्रॉफीच्या अगदी मध्यभागी संस्कृतमध्ये एक खास संदेश लिहिलेला आहे? या एका ओळीच्या वाक्यात आयपीएलचे सर्वात मोठे गुपित दडलेले आहे.

ट्रॉफीवर काय लिहिले आहे आणि त्याचा अर्थ काय?

आयपीएल ट्रॉफीच्या मध्यभागी सोन्याच्या अक्षरांमध्ये संस्कृतमध्ये एक ओळ लिहिलेली आहे, ती म्हणजे 'यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि'. जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असलेल्या संस्कृतमधील या वाक्याचा मराठीत अत्यंत सुंदर अर्थ होतो- 'जिथे प्रतिभा आणि संधीचा मिलाफ होतो'. हे केवळ ट्रॉफीवर लिहिलेले एक वाक्य नाही, तर ही इंडियन प्रीमियर लीगची अधिकृत टॅगलाईन आणि या स्पर्धेचा मूळ मंत्र आहे.

२०११ मध्ये का बदलली ट्रॉफीची डिझाईन?

साल २००८ मध्ये जेव्हा बीसीसीआयने (BCCI) या स्पर्धेची सुरुवात केली, तेव्हा त्यामागील मुख्य उद्देश हाच होता की, भारतातील आणि जगभरातील तरुण व अनकॅप्ड खेळाडूंना एक असे जागतिक व्यासपीठ मिळावे, जिथे ते आंतरराष्ट्रीय दिग्गजांसोबत खेळून आपली क्षमता सिद्ध करू शकतील.

विशेष म्हणजे, आयपीएलच्या सुरुवातीच्या तीन वर्षांत (२००८, २००९ आणि २०१०) आजच्या सारखी दिसणारी ट्रॉफी वापरली जात नव्हती. सुरुवातीला या ट्रॉफीचा आकार भारताच्या नकाशासारखा होता. मात्र, २०११ मध्ये बीसीसीआयने या लीगला जागतिक स्तरावर एक आधुनिक लूक देण्यासाठी ट्रॉफीची डिझाईन पूर्णपणे बदलली आणि तिला एका सुंदर कपचा आकार दिला. २०११ पासून आजतागायत (२०२६) याच डिझाईनची ट्रॉफी विजेत्याला दिली जाते.

– Riyan Parag Injury : श्रीलंका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय! रियान पराग अचानक संघातून बाहेर; 'या' खेळाडूला बनवलं उपकर्णधार

कोण रचणार इतिहास?

या महामुकाबल्यात आरसीबी आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. दोन्ही संघांकडे दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरण्याची संधी आहे. जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हा सामना जिंकला, तर ते सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम करतील. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ दोनच संघांना सलग दोनदा जेतेपद राखण्यात यश आले आहे. त्यामुळे आजची रात्र क्रिकेट जगतासाठी अत्यंत रोमांचक आणि ऐतिहासिक ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat