Iran threat to America: इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तेहरानने वॉशिंग्टनवर हल्ला केल्यास त्याला अश्मयुगात पाठवले जाईल असा कडक इशारा दिला आहे.
इराणचे खासदार इब्राहिम रेझाई यांनी हा इशारा दिला आहे.
याविषयी बोलताना त्यांनी,”जर अमेरिका किंवा त्याच्या मित्र देशांनी इराणवर हल्ला केला तर त्याचे उत्तर केवळ पर्शियन गल्फपुरते मर्यादित राहणार नाही.” असे म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, “इराण शत्रूच्या सर्व लष्करी लक्ष्यांना आणि जिथून हल्ला केला जाईल त्या ठिकाणांना प्रत्युत्तर देईल.” दरम्यान, अमेरिका इस्रायलमध्ये अतिरिक्त हवाई इंधन भरणारी लष्करी विमाने तैनात करणार असल्याचा दावा इस्रायली मीडियाने केला आहे.
उत्तर फक्त पर्शियन गल्फपुरते मर्यादित राहणार नाही Iran threat to America:
इराणच्या संसदेचे सदस्य आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आयोगाचे सदस्य इब्राहिम रेझाई यांनी सोशल मीडियावर सांगितले की, “कोणत्याही संभाव्य शत्रूच्या हल्ल्याला प्रतिसाद फक्त पर्शियन गल्फ प्रदेशापुरता मर्यादित राहणार नाही.” ते म्हणाले की, “इराण शत्रूच्या सर्व लष्करी तळांवर आणि ज्या भागातून हल्ला होणार आहे त्या भागाला प्रत्युत्तर देईल”असेही त्यांनी म्हटले.
ऊर्जा तळांवर हल्ल्याचा इशारा यापूर्वीही दिला होता
इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाने आधीच स्पष्ट करत, “जर त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधा, तेल किंवा वायू प्रतिष्ठानांवर हल्ला झाला, तर प्रत्युत्तर म्हणून पर्शियन आखाती क्षेत्रातील तेल आणि वायू प्रतिष्ठानांना लक्ष्य केले जाईल.” असे म्हटले आहे. “कोणत्याही हल्ल्याला त्याच पातळीवर प्रत्युत्तर दिले जाईल,” असे तेहरानचे म्हणणे आहे.
ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यावरही निशाणा साधला
इब्राहिम रेझाई यांनी यापूर्वी म्हटले होते की, “अमेरिकेचा असा गैरसमज आहे की ते दोन दिवसांत वेगवान आणि विनाशकारी हल्ला करून इराणला नमते घेण्यास भाग पाडू शकतात. गेल्या आठवड्यात वॉशिंग्टन डीसीला भेट देणारे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात हा संभ्रम निर्माण केल्याचे ते म्हणाले.
रेझाईने इशारा दिला, “जर इराणवर हल्ला झाला, तर आम्ही संपूर्ण प्रदेश आणि तेथील सुविधा अश्मयुगात पाठवू. कोणतीही अविवेकी पावले न उचलणे तुमच्या हिताचे आहे.”
अमेरिका अतिरिक्त लष्करी विमाने पाठवणार Iran threat to America:
दरम्यान, इस्रायलीच्या एका संकेतस्थळाने सुरक्षा अधिकाऱ्यांचा हवाला देत दावा केला आहे की, अमेरिकन सैन्य पुढील काही दिवसांत इस्रायलमध्ये सुमारे 10 अतिरिक्त हवाई इंधन भरणारी लष्करी विमाने तैनात करेल. अहवालानुसार, यातील बहुतांश विमाने तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळावर तैनात करण्यात येणार आहेत.
30 हून अधिक अमेरिकन विमाने आधीच उपस्थित
अहवालात असेही म्हटले आहे की, ही नवीन विमाने बेन गुरियन विमानतळावर आधीच तैनात असलेल्या 30 हून अधिक यूएस एअर रिफ्यूलिंग विमानांमध्ये सामील होतील. त्यामुळे या भागातील अमेरिकन लष्करी उपस्थिती आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

