Tuesday, 11 Aug, 9.34 pm प्रभात

ताज्या बातम्या
जामखेड : गोकुळाष्टमीनिमित्त साकेश्वर गो- शाळेचे उद्घाटन

जामखेड : जामखेड मध्ये गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जन्म दिवस निमित्त पाहिल्या गो-शाळेचे उद्घाटन व वृक्षारोपण सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांच्या हस्ते करण्यात आले आहे. गेल्या 5 वर्षापासून या गोशाळेचे जागेची व्यवस्था होत नव्हती व गाईंचे संगोपन करण्यास अनेक अडचणी येत होत्या या सर्व अडचणीवर निलेश गायवळ यांच्या सहकार्याने व श्री शिवप्रतिष्ठानचे तालुकाप्रमुख पांडुरंग भोसले यांच्या पुढाकाराने पत्र्याचे शेड तयार करून देण्यात आले.

यावेळी साकेश्वर गो शाळेचे अजिनाथ पुलावले महाराज, सौताडा चे ह-भ-प मेहबूब महाराज, नगरसेवक महेश निमोणकर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले मनसेचे दादासाहेब सर्नोबत,सावरगाव चे सरपंच काकासाहेब चव्हाण,माजी सरपंच कांतीलाल वराट, शिउरचे डी पु टी विठ्ठल चव्हाण ,जानकी मामा गायकवाड, हर्षल डोके ,राहुल बेदमुथा, राहुल पवार,किशोर गायवळ ,हनुमंत पाटील, सर्व शिवभक्त शिवप्रतिष्ठानचे धारकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीकृष्ण व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. शिवप्रतिष्ठान तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी वृक्ष देऊन श्री निलेश गायवळ यांचा सत्कार केला. मान्यवरांच्या हस्ते गो पूजन करून गाईंना चारा, पेंड देण्यात आले.

श्री निलेश गायवळ मनोगतामध्ये पाच वर्षापासून मदत करण्याचा शब्द दिला होता तो यानिमित्ताने पूर्ण झाला होता मित्रपरिवाराने नियोजन केले व सर्वांनी ही पुढे येऊन सहकार्य करावे असे मनोगत.ह-भ-प मेहबूब महाराज यांनी सर्व दानशूर व्यक्तींचे अभिनंदन करून यापुढेही हातभार लावावा अशी विनंती केली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top