Sunday, 24 Jan, 9.21 pm प्रभात

मुखपृष्ठ
जिल्हा बँक : निवडणूक महाविकास आघाडीची 27 नंतर ठरतील धोरणे

नगर (प्रतिनिधी) - जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक यापूर्वी घेतलेली आहेच. आता 27 तारखेपर्यंत थांबा. उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदामंत्री शंकरराव गडाख एकत्रित बसून पुढील निर्णय घेतील, अशा सूचना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज दिल्या.

ज्येष्ठ नेते पवार आज नगरमध्ये होेत. आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी ते काही काळ भोजनासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्राथमिक माहिती घेतली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरीची मुदत व छाननी संदर्भात त्यांना प्राथमिक माहिती देण्यात आली.

त्यानंतर पवार यांनी जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडीतील सर्वांना विश्‍वासात घेऊनच होईल, असे स्पष्ट केले. त्यासाठी नेत्यांशी अगोदर चर्चा करु. ते महाविकास आघाडीचा एकत्रित निर्णय पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा करुन अंतिम करतील, अशा सूचना दिल्या.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार राहुल जगताप, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग आदींसह मोजके पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top