Dailyhunt
जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांचे वेळापत्रक जाहीर

जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांचे वेळापत्रक जाहीर

प्रभात 5 years ago

पुणे -जिल्हा परिषद तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी बदल्यांच्या प्रक्रियेसाठी पुणे जिल्हा परिषदेने वेळापत्रक जाहीर केले आहे. सोमवारपासून (दि. 13) याच्या कामकाजास सुरुवात करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या दरवर्षी 31 मे महिन्याच्या पूर्वी कराव्यात, असा नियम आहे. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे बदल्या रद्द केल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, हा निर्णय मागे घेत येत्या 31 जुलैपर्यंत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

जिल्हा व तालुकास्तर बदल्यांचे वेळापत्रक
संवर्गनिहाय वास्तव सेवाज्येष्ठता यादी सादर करणे - 13 जुलै
जिल्हास्तरावर एकत्रित सेवाज्येष्ठता यादी तयार करणे, जाहीर करणे - 14 जुलै
सूचना व हरकती मागविणे - 15 जुलै
आक्षेप व सूचनांचे निराकरण करणे - 17 जुलै
अंतिम सेवाज्येष्ठता यादी जाहीर करणे - 17 जुलै
समुपदेशनाने जिल्हास्तरीय बदली प्रक्रिया पूर्ण करणे - 20 ते 25 जुलै
तालुकास्तरीय बदली प्रक्रिया पूर्ण करणे - 27 ते 31 जुलै

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat