Thursday, 29 Jul, 10.26 am प्रभात

ट्रेंडिंग
जिल्हा परिषदेचा यंदा 100 टक्‍के निधी होणार खर्च

पुणे - यंदाच्या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेकडे उपलब्ध असणाऱ्या निधीमधून शंभर टक्‍के खर्च करण्यास परवानगी देण्याचा ठराव बुधवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली दौंड येथे झाली.

यावेळी उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबुराव वायकर, महिला आणि बालकल्याण सभापती पूजा पारगे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, सदस्य वीरधवल जगदाळे, शरद बुट्टे पाटील, आशा बुचके, अंकुश आमले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले उपस्थित होते.

राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी साठ टक्‍के खर्च करण्यासंदर्भात सूचना दिले. परंतु, ग्रामीण विकास विभागाकडून या कपातीसंदर्भात सूचना नाहीत. तसेच जिल्हा परिषदेला दीडपट नियोजन करण्यास परवानगी आहे. त्यामुळे उपलब्ध तरतुदीच्या शंभर टक्के खर्च करण्यास हरकत नसल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. त्यास प्रशासनाने सहमती दर्शवली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top