Tuesday, 19 Nov, 10.47 pm प्रभात

मुखपृष्ठ
जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहिर

- 7 जानेवारीला मतदान, 8 जानेवारी रोजी मतमोजणी

मुंबई: नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान होणार असून 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मंगळवारी येथे केली. आयुक्तांच्या घोषणेमुळे संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे.

या सर्व निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2019 पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान 7 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी 8 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येई, असे राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम
- नामनिर्देशनपत्र सादर करणे- 18 ते 23 डिसेंबर 2019
- नामनिर्देशनपत्रांची छाननी- 24 डिसेंबर 2019
- अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 30 डिसेंबर 2019
- अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 1 जानेवारी 2020
- मतदानाचा दिनांक- 7 जानेवारी 2020
- मतमोजणीचा दिनांक- 8 जानेवारी 2020

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>