Dailyhunt
जिल्ह्यात 258 करोना बाधितांची भर

जिल्ह्यात 258 करोना बाधितांची भर

प्रभात 5 years ago

नगर -जिल्ह्यात आज 106 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 58 हजार 433 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.93 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 258 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 1 हजार 579 झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 40, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 64 आणि अँटिजेन चाचणीत 154 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 11, अकोले 3, कर्जत

1, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 14, नेवासे 1, पारनेर 4, राहाता 1, शेवगाव 1, श्रीगोंदा 2, अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 16, अकोले 5, कर्जत 1, कोपरगाव 8, नगर ग्रामीण 9, नेवासे 2, पारनेर 3, पाथर्डी 2, राहाता 5, राहुरी 4, संगमनेर 8, श्रीरामपूर 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज 154 जण बाधित आढळून आले.

यामध्ये मनपा 3, अकोले 9, जामखेड 3, कर्जत 3, कोपरगाव 5, नगर ग्रामीण 1, नेवासे 11, पारनेर 9, पाथर्डी 14, राहाता 20, संगमनेर 45, शेवगाव 14, श्रीगोंदा 11, श्रीरामपूर 5, कॅन्टोन्मेंट 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 14, अकोले 20, जामखेड 14, कर्जत 7, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 1, नेवासे 10, पारनेर 1, पाथर्डी 10, राहुरी 1, शेवगाव 9, श्रीगोंदा 16, श्रीरामपूर 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat