Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Jivaji Mahale memorial : जीवाजी महालेंच्या स्मारकासाठी पाच लाखांचा निधी; खा. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे दातृत्व

Jivaji Mahale memorial : जीवाजी महालेंच्या स्मारकासाठी पाच लाखांचा निधी; खा. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे दातृत्व

प्रभात 4 months ago

Jivaji Mahale memorial - छ. शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकासाठी खा. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्यावतीने पाच लाख रुपयांचा निधी नुकताच सुपूर्द करण्यात आला.

याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालयीन सहाय्यक मंगेश चिवटे यांचा समस्त नाभिक समाज तसेच शिवरक्षक शौर्य फाउंडेशनचे संस्थापक-राज्याध्यक्ष मंगेश काशीद यांच्यावतीने सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.

शूरवीर जिवाजी महाले यांचे स्मारक त्यांच्या जन्मगावी कोंढवली (ता. वाई) येथे उभारण्यात यावे, अशी मागणी समस्त नाभिक समाज, शिवप्रेमी आणि ग्रामस्थांकडून अनेक वर्षापासून करण्यात येत होती. तसेच जिवाजी महाले यांचे वंशज आजही कोंढवली येथे वास्तव्यास असून त्यांच्या बिकट कौटुंबिक परिस्थितीचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हा व्हिडिओची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांनी तत्काळ दखल घेत मंगेश चिवटे यांना प्रत्यक्ष पाहणी करून मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अवघ्या दोन-तीन दिवसात मंगेश चिवटे यांनी कोंढवली येथे भेट देत संबंधित कुटुंबाला एक लाख रुण्यांची आर्थिक मदत देऊन जिवाजी महालेंच्या अपंग वंशजाच्या वैद्यकीय उपचारांचा संपूर्ण खर्च करण्याचे आश्वासनही दिले.

याचबरोबर शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारक उभारणीसाठी प्रारंभी पाच लाख रुण्यांचा निधी देण्यात आला असून उर्वरित स्मारक पूर्णत्वास नेण्यासाठीही सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी दत्तात्रेय तावरे, चंद्रकांत सपकाळ, बजरंग काशीद, मिथुन पवार, गणेश काशीद, कृष्णा जाधव, बाबुराव पवार, जीवन गायकवाड तसेच जिवाजी महाले संघटना, वाई तसेच शिवरक्षक शौर्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि कोंढवली गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat