Monday, 16 Apr, 12.00 pm प्रभात

मनोरंजन
ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या 121 व्या वर्षानिमित्त ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाचा लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा, सुनिता गायकवाड, क्रीडापटू तेजश्री नाईक यांना प्रदान करण्यात येणार आहे. दत्तमंदिर ट्रस्टच्या संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा गौरव पुरस्काराने केला जातो, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते यांनी दिली.

मोहिते म्हणाले, पुरस्कार सोहळ्याचे यंदा चौथे वर्ष आहे. दत्त महाराजांची प्रतिकृती, रुपये 25 हजार रोख, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. दरवर्षी मंदिर वर्धापनदिनी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. महिला सबलीकरण, साक्षरता, बालकल्याण, सामाजिक बांधिलकी व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे.

Dailyhunt
Top