Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कामगार परतल्याचा महाराष्ट्रावर परिणाम

कामगार परतल्याचा महाराष्ट्रावर परिणाम

प्रभात 5 years ago

मुंबई - लॉकडाऊननंतर कामगार घरी परत गेले आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम दिल्ली आणि महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांवर होणार असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या आधारावर काम निभावून नेण्यासाठी ऑटोमेशन करण्याचा प्रयत्न कंपन्या करीत आहेत. तरीही हे स्थित्यंतर इतक्‍या वेगात होणार नाही. यासाठी मोठ्या भांडवलाची गरज लागते. त्यामुळे उद्योगांना त्यांच्या क्षमतेइतके काम करता येणार नाही.उत्पादनाचा खर्च वाढेल. याचा परिणाम या कंपन्यांच्या नफ्यावर होणार असल्याचे इंडिया रेटिंग अँड रिसर्च या संस्थेच्या अभ्यास आवाजात म्हटले आहे.

लॉकडाऊननंतर कर्मचारी आपल्या गावी परत गेले.

केंद्र सरकारने आणि संबंधित राज्यांनी या मजुरांना काम उपलब्ध व्हावे, यासाठी रोजगार हमीसारखी योजना सुरू केलेली आहे. दरम्यानच्या काळात लस उपलब्ध नसल्यामुळे देशातील विविध भागांतील विशेषत: शहरातील परिस्थिती आणखीही पूर्ववत झालेली नाही.

सेवा क्षेत्रातील कर्मचारी जास्त प्रमाणात आपल्या गावी परत गेले नाहीत. मात्र, मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्रातील कर्मचारी जास्त प्रमाणात आपल्या गावी परत गेले आहेत. याचा आणि मॅन्युफॅक्‍चरिंगमधील छोट्या उद्योगांवर जास्त परिणाम होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat