Saturday, 25 Sep, 5.48 pm प्रभात

ताज्या बातम्या
कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी यांचं ठरलं; 28 सप्टेंबर रोजी होणार काँग्रेसमध्ये सामील

नवी दिल्ली - जेएनयूएसचे माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेते कन्हैया कुमार येत्या 28 सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. काँग्रेसच्या मुख्यलयात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. यावेळी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी देखील काँग्रेसची सदस्यता घेणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं.

एकापाठोपाठ एका निवडणुकीत पराभव स्वीकारणाऱ्या काँग्रेसने पक्षात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीसह लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केल आहे. आगामी काळात भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून जातीच्या समिकरणांसह युवा चेहऱ्यांना संधी देण्यात येत आहे.

युवा नेते कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांना पक्षात सामील करून घेणे हा 2024 च्या निवडणुकीच्या तयारीचा भाग असल्याचं समजतं.

कन्हैया कुमारने बिहारमधील बेगुसराय येथून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र भाजपच्या गिरीराज सिंह यांच्याकडून कन्हैया यांचा पराभव झाला. दुसरीकडे जिग्नेश मेवानी आमदार असून 2017 मध्ये काँग्रेसने त्यांच्याविरुर्ध उमेदवार दिला नव्हता. गुजरातमध्ये ७ टक्के दलित मतदार असून काँग्रेसला याचा लाभ होऊ शकतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top