Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
करोना उपचाराच्या बाबतीत अमेरिकेची चांगली कामगिरी-ट्रम्प

करोना उपचाराच्या बाबतीत अमेरिकेची चांगली कामगिरी-ट्रम्प

प्रभात 6 years ago

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील मोठ्या राष्ट्रांच्या तुलनेत अमेरिकेत करोना उपचारासाठी सुरू असलेले प्रयत्न अधिक यशस्वी झाले असल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, करोनाच्या बाबतीत आम्ही चांगले यश संपादन केले आहे पण भारतासारख्या दुसऱ्या मोठ्या देशात मात्र याविषयी मोठीच समस्या आहे.

भारतातील करोना रुग्णांची संख्या साडेअठरा लाखांवर गेली आहे, असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. जगातील अन्य मोठ्या देशांच्या तुलनेत अमेरिकेतील स्थिती अत्यंत चांगली आहे असे ते आज येथे वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.
भारत आणि चीनपेक्षाही अमेरिका मोठा देश आहे हेही विसरता कामा नये, असेही त्यांनी नमूद केले.

चीनलाही पुन्हा करोना सतावू लागला आहे.

भारतात मोठी समस्या आहे आणि अन्य देशांमध्येही करोना
हा एक मोठा धोका आहे, असे ते म्हणाले. अमेरिकेतील करोनाग्रस्तांची संख्या 47 लाखांवर गेली असून तेथील 1 लाख 55 हजार लोक करोनाने दगावले आहेत. आम्ही अमेरिकेत सहा कोटी करोना टेस्टिंग केले आहे.

जगातला कोणताही देश टेसिंटगच्या बाबतीत आमच्या जवळपासही नाही. अन्य कोणत्याही देशाने आमच्यापेक्षा 50 टक्केही टेसिंटग केलेले नाही. करोना नियंत्रणाच्या बाबतीत आमची एकूणच कामगिरी जगातील अन्य देशांपेक्षा चांगली आहे असे त्यांनी नमूद केले. त्यामुळेच अमेरिकेतील करोनाग्रस्तांच्या संख्येत आता सहा टक्‍क्‍यांची घट झाली आहे. अमेरिकेच्या दक्षिण आणि पश्‍चिमेकडील भागातल्या हॉटस्पॉटचीही स्थिती सुधारत आहे, असेही ट्रम्प यांनी यावेळी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat