Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
काश्‍मिरात बर्फवृष्टी सुरू; तापमानाचा पारा खालावला

काश्‍मिरात बर्फवृष्टी सुरू; तापमानाचा पारा खालावला

प्रभात 5 years ago

Madhuvan

श्रीनगर - काश्‍मिरात गुलमर्ग आणि अन्य ठिकाणी रविवारी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे काश्‍मीर खोऱ्याचा तापमानाचा पारा खालावला आहे. गुलमर्गला स्की रिसॉर्ट आहे. तेथे रविवारी सायंकाळपासून बर्फवृष्टी सुरू झाली. ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

मध्य काश्‍मिरातील गंदरेबाल जिल्ह्याच्या सोनमर्गलाही बर्फवृष्टी झाली. तसेच श्रीनगर-लेह मार्गावरील जोझीला पास भागातही बर्फवृष्टी झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. काश्‍मिरातील प्रख्यात मुघल रोडवरही पाऊस आणि बर्फवृष्टीची नोंद झाल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या बर्फवृष्टीने काश्‍मीरचे सामान्य तापमान खुपच घटले असून ही थंडीची सुरुवात मानली जात आहे.

काही भागात अजून पाऊसही पडतो आहे. त्यामुळे तेथील हवामान सध्या काहीसे विचित्र बनले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat