Monday, 25 Jan, 10.00 am प्रभात

ताज्या बातम्या
कतरिना कैफ-विजय सेतुपतिची जोडी झळकणार

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच साउथ स्टार विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन हे करणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात इंटरवल होणार नाही. हा चित्रपट 90 मिनिटांचा असणार आहे.

या चित्रपटाचे नाव अद्याप निश्‍चित करण्यात आलेले नाही. परंतु याची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. हा एक थ्रिलर चित्रपट आहे. याचे शूटिंग एप्रिलपासून करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे शेड्यूल 30 दिवसांचे असून यातील शूटिंग पुणे आणि मुंबईत शूट करण्यात येणार आहे.

श्रीराम राघवन हे प्रत्येकवेळी आपल्या चित्रपटात नवनवीन प्रयोग करत असतात. यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. वास्तवमध्ये या चित्रपटाची कथा असा पद्धतीने लिहिण्यात आली आहे, ज्यामुळे चित्रपटात इंटरवलची आवश्‍यकताच भासणार नाही.

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कतरीना कैफ लवकरच अक्षय कुमारसोबत 'सूर्यवंशी'मध्ये झळकणार आहे. सध्या कतरीना ही आपल्या आगामी 'भूत पुलिस'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्‌टर मुख्य भूमिका साकारत आहे.

दुसरीकडे विजय सेतुपतिचा 'मास्टर' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. हा लॉकडाउननंतर सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top