Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Kejriwal E20 Protest : E20 वरून दिल्लीत गदारोळ! 'आप'चा मोर्चा पोलिसांनी रोखला ; केजरीवालांचा केंद्रावर हल्लाबोल

Kejriwal E20 Protest : E20 वरून दिल्लीत गदारोळ! 'आप'चा मोर्चा पोलिसांनी रोखला ; केजरीवालांचा केंद्रावर हल्लाबोल

Kejriwal E20 Protest :ई-२० पेट्रोलच्या संदर्भात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत इथेनॉल मिश्रित इंधनावरून एका मोठ्या राजकीय संघर्षाची शक्यता आहे. एकीकडे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पीएस हाऊसकडे मोर्चा काढला आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा फिरोजशाह रोडवर अडवला आहे. यावेळी अरविंद केजरीवाल आपच्या कार्यकर्त्यांसह शेकडो लोकांसह रस्त्यावरच धरणे आंदोलन करण्यासाठी बसले आहेत.

तर दुसरीकडे, वाहतूक संघटना ई-२० पेट्रोलच्या विरोधात संसदेकडे मोर्चा काढण्याची तयारी करत आहेत. परिणामी, ई-२० इंधनावरील सध्या सुरू असलेली चर्चा आज अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

आम आदमी पक्षाचे (आप) म्हणणे आहे की, देशभरात ई-२० पेट्रोल लागू करण्याच्या निर्णयामुळे सामान्य नागरिक आणि लाखो वाहन मालकांवर अतिरिक्त भार पडत आहे. Kejriwal E20 Protest :

पक्षाचा आरोप आहे की, सरकारने हा निर्णय घेण्यापूर्वी पुरेशी चर्चा केली नाही आणि जुन्या वाहनांवर होणाऱ्या परिणामांबद्दलच्या जनतेच्या चिंतांकडे दुर्लक्ष केले. याच मुद्द्यावर अरविंद केजरीवाल आज पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढणार आहेत.

दरम्यान, मोर्चा काढण्याच्या अगोदर अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी पुन्हा एकदा E20 मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 2 लाख 33 हजार 238 याचिकांसह आम्ही पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जात आहोत, असा व्हिडिओ केजरीवाल यांनी जारी केला आहे. Kejriwal E20 Protest :

जिथे आम्ही ही सर्व पत्रे पंतप्रधानांना सुपूर्द करणार आहोत. ते म्हणाले की आमच्यासोबत 100 लोक आहेत ज्यांच्या कार E20 ने खराब झाल्या आहेत. पंतप्रधान जनतेचा आवाज नक्कीच ऐकतील अशी आशा आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat