Saturday, 25 Sep, 6.24 pm प्रभात

ताज्या बातम्या
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना हवेलीतील शेतकऱ्यांनी दिले निवेदन

वाघोली - पुणे- नाशिक रेल्वे, पीएमआरडीए रेल्वे प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भेटुन समस्या सांगून त्या विरोधातील निवेदन मंत्री महोदयांना दिले असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य श्याम गावडे यांनी दिली.

सध्या हवेलीतील पुणे- नाशिक रेल्वे, पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरणाकडून आयोजित केलेल्या विकास आराखड्यात नमूद असलेल्या रेल्वे प्रकल्प ला शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी गाव बैठका तसेच आंदोलने देखील केली आहेत.

माजी राज्यमंत्री संजय भेगडे व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांना प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या समस्या बाबत अवगत करून दिले. खेड, आंबेगाव, जुन्नर भागातील देखील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी व शेतकऱ्यांनी आपली बाजू केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या पुढे मांडली.

माजी मंत्र्यांनी शब्द पाळला…
प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये माजी मंत्री संजय भेगडे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची भेट घालून बैठक आयोजित करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. त्यानुसार माजी मंत्री संजय भेगडे यांनी बैठक लावून त्या आश्वासन पूर्ण केल्याने शेतकर्‍यांच्या वतीने माजी मंत्र्यांनी शब्द पाळला अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top