Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Kewal Singh Dhillon : आगामी विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये सत्ता स्थापन करू; केवल सिंग धिल्लोंनी व्यक्त केला विश्वास

Kewal Singh Dhillon : आगामी विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये सत्ता स्थापन करू; केवल सिंग धिल्लोंनी व्यक्त केला विश्वास

Kewal Singh Dhillon : पंजाब भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष केवल सिंग धिल्लों (Kewal Singh Dhillon) यांनी शनिवारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचे खूप चांगली असे वर्णन केले आहे.

तसेच, सत्ताधारी आम आदमी पक्षाने या निवडणुकीत शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी केला.

पंजाब भाजप अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर फगवाडा येथील त्यांच्या पहिल्या दौऱ्यात धिल्लों (Kewal Singh Dhillon) यांनी दावा केला की, पक्षाची खरी कामगिरी २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येईल.

ज्याप्रमाणे भाजपने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जिंकली, त्याचप्रमाणे पंजाबमध्येही भाजप सत्ता स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांच्या निवासस्थानी भेट दिली.

नागरी संस्था निवडणुकीत आपच्या हुकूमशाहीवर बोट ठेवत धिल्लों म्हणाले की, त्यांचे मूळ गाव असलेल्या बर्नाला येथे भाजपच्या एका उमेदवारावर कथितपणे हल्ला करून त्याच्या डोक्याला दुखापत करण्यात आली, तर दुसऱ्या उमेदवाराची कागदपत्रे फाडण्यात आली.

जनता या अत्याचाराला विधानसभा निवडणुकीत चोख उत्तर देईल. आपला सत्तेबाहेरचा रस्ता दाखवून आणि भाजपला सत्तेवर आणून जनता त्यांना धडा शिकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आप सरकार सर्व आघाड्यांवर, विशेषतः कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे पंजाबमधील जनता त्यांना कंटाळली आहे आणि त्यांचा भ्रमनिरास झाला आहे असे ते म्हणाले. राज्यात पक्षाच्या विस्ताराच्या योजनांबद्दल माहिती देताना धिल्लों (Kewal Singh Dhillon) म्हणाले की, ते पक्षाचे कार्यक्रम आणि योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर काम करणार आहेत.

राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर, भाजप शेतकऱ्यांच्या मागणीनुसार डाळी, मका आणि इतर पिकांवर एमएसपी देईल, असे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांचा सर्व शेतीमाल एमएसपी दराने खरेदी केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी शेवटी केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat