Sunday, 25 Aug, 3.13 am प्रभात

ठळक बातमी
क्‍लब चालकाची मुजोरी ; पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यास धक्का-बुक्की

ऍरिझोनl स्नुकर ऍण्ड क्‍लबमधील घटना
पुणे,दि.25- घोले रस्त्यावरील एका क्‍लब चालकाने पोलीस कर्मचाऱ्यास हॉटेल बाहेर ढकलत पोलीस अधिकाऱ्यास धक्का-बुक्की केली. ही घटना ऍरिझोन स्नुकर ऍण्ड क्‍लबमध्ये पहाटे दोन वाजता घडली. याप्रकरणी निलेश आनंद पाटील(35,रा.पाटील बंगला, घोले रस्ता, शिवाजीनगर) याला डेक्कन पोलिसांनी अटक केली.
फिर्यादी पोलीस शिपाई अवधूत जमदाडे हे पोलीस शिपाई एस.एस.शिंदे यांच्यासह शनिवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी त्यांना पहाटे दोनच्या सुमारास ऍरिझोन स्नुकर ऍण्ड क्‍लबमध्ये ग्राहकांना खाद्य पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याचे आढळले. त्यांनी क्‍लब मालक आणी कर्मचाऱ्यांना क्‍लब बंद करण्याची विनंती केली. मात्र मालक निलेश पाटील याने फिर्यादीला क्‍लब बाहेर ढकलून अरेरावी केली. त्यांच्याशी हुज्जत घालून तुला काय करायचे ते कर, मी क्‍लब बंद करणार नाही असा दम दिला. यानंतर तेथे आलेल्या प्रभारी नाईटवरील पोलीस अधिकाऱ्यासही धक्का-बुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए.आर.महाजन करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top