Dailyhunt
कोल्हापूर | लाचप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्यातील कनिष्ठ लिपिक जेरबंद

कोल्हापूर | लाचप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्यातील कनिष्ठ लिपिक जेरबंद

प्रभात 4 years ago

कोल्हापूर(प्रतिनिधी) -पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना येथील सार्वजनिक बांधकाम खात्यातील कनिष्ठ लिपिक जेरबंद राजेश प्रकाश खाडे (वय ३६) राहणार रमणमळा कोल्हापूर असे त्याचे नाव आहे.

तक्रारदार रविराज सावंत यांच्या वडिलांचे काही महिन्यापूर्वी निधन झाल्याने त्यांची पेन्शन आईच्या नावावर करण्यासाठी खाडे याने पाच हजार रुपयाची मागणी केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधिक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सापळा रचून खाडे याला अटक केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मोरे, संजीव बम्बर्गेकर, अजय चव्हाण, कृष्णात पाटील, रुपेश माने यांच्या पथकाने कारवाई केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat